आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन:नवोपक्रमात सहभागी व्हावे

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी केले आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२२:२३ या स्पर्धेचे आयोजन पाच गटांमध्ये करण्यात आले आहे. त्यात पहिला गट पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका व पर्यवेक्षिका यांच्यासाठी तर दुसरा गट प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, तिसरा गट माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी, गट क्रमांक चार विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल आणि गट क्रमांक पाच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) अशा प्रकारे पाच गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...