आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना:आजारी महिलेला मारहाण; पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत असताना तालुक्यातील सोनखुर्द गावातील जरीपाडा येथील सिकलसेल आजाराने पीडित महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. अखेर आंदोलनानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक २१ ऑगस्ट धडगाव पोलिस कर्मचारी सोनखुर्द गावात कारवाईसाठी गेले होते. या वेळी छाया राजेश पटले एकटी घरात असताना तिला पतीबद्दल विचारणा करत पोलिस उपनिरीक्षकासह तीन ते चार पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या कारवाईत मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे महिलेच्या अंगावर दिसत आहे. कारवाईला गेलेल्या पोलिसांबरोबर एक महिला पोलिस कर्मचारीही होती; परंतु तिने न मारता पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी सिकलसेल पीडित महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तिचे पती घरी आल्यावर ती बेशुद्ध आढळल्यानंतर त्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुद्धीवर आल्यावर तिने सर्व हकिकत पतीला सांगितली. मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रार दाखलचा निर्णय घेतला; परंतु पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तीन दिवस पीडित कुटुंब पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा नोंदवून न्याय मिळण्यासाठी चकरा मारत होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी पीडित कुटुंबाने ठाण मांडून मागणी मान्य करून घेतल्याने अखेर मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा पीडित छाया पटले यांनी व्यक्त केली आहे.

दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा
आदिवासी समाजावर अत्याचार करताना कुठलीही बाजू समजून न घेता एकतर्फी कारवाई केली जाते. यात संबंधितांकडून एका महिलेला कारण नसताना अमानुष मारहाणीचा प्रकार घडलेला आहे. यात संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
प्रवीण चिमा पावरा, आदिवासी टायगर सेना, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र

बातम्या आणखी आहेत...