आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नंदुरबारात बाप्पाच्या मूर्ती बनवण्याचा श्रीगणेशा; मागच्या वर्षीच्या अनेक मूर्ती कारखान्यांत पडून

नंदुरबार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळातील मूर्ती आजही तशाच पडून असून यंदा पीओपीच्या मूर्तींवर बंदी येणार की नाही, याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्याने मूर्तीकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र यंदा येत्या ३१ आॅगस्ट रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असल्याने नंदुरबारच्या गणेश मूर्तीकारांच्या कारखान्यात मूर्ती बनवण्याला वेग आला आहे. शासनाच्या जाचक अटी अन् कोरोनामुळे मूर्तीकांराचा उद्योग सद्यातरी संकटात सापडला आहे.

गत वर्षी चारफूटीच्या मूर्तीं स्थापन करण्याला परवानगी देण्यात आल्याने मध्य प्रदेश वगळता अन्य ठिकाणी चार फूटीच्या गणेश मूर्ती विक्री झाल्या. आता तर मूर्तीकारांसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे. मूर्तीची उंची चार फूटीच असणार का? पीओपीवर बंदी असेल की सवलत? आदी संभ्रम कायम आहे. शासनाने मूर्तीकारांना आधी विश्वासात घेतले पाहिजे, त्यानंतरच नियम बनवला पाहिजे, असा एक मतप्रवाह मूर्तीकारांमध्ये आहे.

मुंबई येथे उपायुक्त काळे यांच्या उपस्थितीत नंदुरबार, मुंबई व राज्यातील मूर्तीकारांची गुरुवारी १६ जून रोजी दुपारी ४ वाजेला बैठक पार पडली. परंतु या बैठकीतही ठोस असा निर्णय घेण्यात आला नाही. पीओपीने नद्यांचे प्रदुषण होते, मग याला पर्याय काय? असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच जो पर्यंत पर्याय उपलब्ध हेात नाही, तो पर्यंत पीओपीच्या मूर्तीं बनविण्यास परवानगी देण्याची मागणी मूर्तीकारांनी केली आहे. सद्या अनेकांना रोजगार देणारा गणेश मूर्ती बनविण्याचा उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळे मूर्तीकारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

शहरात ३० हून अधिक मूर्तिकार
नंदुरबार शहरात ३० हून अधिक मूर्तीकार असून गणेश मूर्ती बनवण्यासाठी नंदुरबार शहर राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट, शासनाचे नवनवीन नियम यामुळे हा व्यवसाय संकटात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...