आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सांभाळा:सावधान, तीन दिवस उष्णतेची लहर; पारा 43.8 अंशांवर, सकाळी 9 वाजेपर्यंत कामे उरका व दिवसभर घरातच बसा

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मे हीटचा तडाखा जाणवत आहे. मंगळवारी तापमान थेट ४३.८ अंशांवर पोहोचल्याने उन्हाचा अधिकच परिणाम जाणवला. आजपासून (बुधवार, दि.६) तीन दिवस (शुक्रवा, दि.८) जिल्ह्यात उष्णतेची लहर असेल, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका, सकाळी ९ वाजेपर्यंत कामे उरका व दिवसभर घरात बसावे, या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका आहे. भरउन्हात शीतपेय, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक पिणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे.

शहरासह जिल्ह्यात मार्च पासूनच उष्णतेचा पारा हा सातत्याने चाळीस अंश सेल्सिअसच्या वर जात असल्याने यंदा नंदुरबारकर उन्हाच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत. त्यात मंगळवारी पारा थेट ४३.८ अंशांवर गेल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तसेच गेल्या आठवड्यापासून उष्णतेचा पारा ४० अंशांच्यावर होता. तर तीन दिवसांपासून पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेला. मंगळवारी तर उन्हाने कहर केला. दुपारी तापमान ४३.८ अंश नोंदले गेले.

त्यामुळे यंदाच्या हंगामातील हे सर्वात अधिक तापमान असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या तापमानात प्रकृती बिघडू शकते. लहान, मुलांसह वृद्धांना याचा अधिक त्रास होण्याची भीती आहे. प्रत्येकाने उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...