आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:भक्ती उत्सव बंद होत नाही ;  संत लोकेशानंद महाराज

शहादा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भक्ती केल्याने मनुष्य दुःख विसरतो. प्रत्येकाच्या घरात उत्सव राहील. सकारात्मक विचार केल्याने जीवन फलदायी होते. तीच खरी जीवनाची संपत्ती आहे. उत्सव कधी बंद होत नाही. नवीन उत्सवाची तयारी आहे, असे प्रतिपादन संत लोकेशानंद महाराज यांनी केले.लोणखेडा तालुका शहादा येथे कृषी महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या श्री नारायणपूरम मंदिराच्या आवारात दिनांक १८ ते २४ नोव्हेंबरपर्यंत अमृत भक्ती महोत्सव सुरू होता. त्या महोत्सवाच्या दिनांक २४ नोव्हेंबर राेजी समारोप प्रसंगी संत लोकेशानंद महाराज बोलत होते.

पूजन व आरती करण्यात आली. समारोपच्या भक्तिमय वातावरणात भक्त अक्षरशः तल्लीन होऊन नाचत होते. महिला व पुरुष फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री विष्णू भगवान यांच्या जल्लोष करत होते.

पुढे बोलतांना संत लोकेशानंद महाराज म्हणाले, सकारात्मक विचार केल्याने जीवन फलदायी होते. प्रत्येकाच्या घरात उत्सव राहील तीच खरी संपत्ती आहे. भक्ती केल्याने जीवनाच्या मार्ग सुकर होतो. दानधर्म केल्याने सेवा धर्म पूर्ण होतो. कोणतेही मंदिर असो ते पवित्र आहे, त्याचे पावित्र्य कायम ठेवा. शहादा येथील नारायणपूरम हे पवित्र धाम आहे. तुळशी पूजेला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे, हे ग्रंथात नमूद आहे. प्रत्येकाने मनापासून परमेश्वराची पूजन केल्यास परमेश्वर त्याला भेटतो, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...