आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नवापूर डोकारे साखर कारखान्याच्या चेअरमनपदी‎ भरत गावित; व्हा.चेअरमनपदी जगन कोकणी‎

नवापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आदिवासी डोकारे‎ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी ‎भरत गावित यांची तर व्हाईस ‎चेअरमनपदी जगन काेकणी यांची ‎बुधवारी बिनविरोध निवड करण्यात ‎ ‎ आली. कारखाना कार्यालयात ही‎ निवड प्रक्रिया झाली. याप्रसंगी‎ प्रांगणात शेतकरी, ग्रामस्थ व ‎ पदाधिकारी माेठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎ आदिवासी सहकारी साखर‎ कारखान्यात गेल्या पाच पंचवार्षिक‎ पासून निवडणूक बिनविरोध हाेत‎ आली असून या ठिकाणी काँग्रेस‎ पक्षाची एक हाती सत्ता होती. मात्र‎ पहिल्यांदाच निवडणूक लागल्याने‎ त्यात काँग्रेसच्या शेतकरी विकास‎ पॅनलचा पराभव झाला.

भाजप‎ पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे उमेदवार‎ बहुमताने निवडून आले. ४ जानेवारी‎ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन‎ पदांची निवड करण्यात आली.‎ साखर कारखान्याचे चेअरमन भरत‎ माणिकराव गावित तर व्हाईस‎ चेअरमनपदी तालुक्यातील नावली‎ येथील जगन चंद्रा कोकणी यांची‎ बिनविरोध निवड झाली. राज्याचे‎ आदिवासी विकास मंत्री‎ डॉ.विजयकुमार गावित यांना मंत्री‎ पद मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रातील‎ ‎ही पहिलीच निवडणूक होती.‎ त्यामुळे मंत्री डाॅ.गावित यांच्यासाठी‎ ती प्रतिष्ठेची मानली जात होती. तर‎ काँग्रेसचे माजी मंत्री सुरुपसिंग‎ नाईक आणि आमदार शिरीष नाईक‎ यांची कारखान्याच्या स्थापनेपासून‎ एक हाती सत्ता होती.

त्यामुळे ही‎ निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.‎ मात्र भाजपने या कारखान्यावर एक‎ हाती सत्ता काबीज केली.‎ नवनिर्वाचित चेअरमन पदी भरत‎ गावित विराजमान झाल्याने भाजप‎ नेते मंत्री डॉ.गावित खासदार‎ डॉ.हीना गावित, जिल्हा परिषद‎ अध्यक्ष सुप्रिया गावित, माजी‎ आमदार शरद गावित यांच्यासह‎ कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.‎ मंत्री डाॅ. गावित यांनी नूतन‎ पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला त्या‎ वेळी जल्लाेष करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...