आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

नंदुरबार8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धुळे चौफुली जवळ नवापूर रस्त्यावरील वीरशैव लिंगायत गवळी समाज स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

गवळी समाज शिष्टमंडळास दिलेल्या अभिवचनानुसार पालिकेच्या माध्यमातून सुमारे २४ लाख रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. या प्रसंगी बोलताना रघुवंशी म्हणाले की, गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कटिबद्ध आहे. या प्रसंगी नगरसेवक परवेज खान, दीपक दिघे, कैलास पाटील, जगन माळी, आरिफ शेख, अभियंता गणेश गावित, किशोर वाडिले तसेच मोहितसिंग राजपूत, हिरालाल चौधरी, वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, सचिव अशोक यादबोले, प्रकाश घुगरे, लक्ष्मण गवळी, आनंदा घुगरे यांच्यासह येथील गवळी समाजाचे पंच मंडळी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...