आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा येथे नंदुरबार जिल्हा मुस्लिम सेवा संघाच्या वतीने महिलांसाठी नर्सिंग होम हॉस्पिटलच्या जागेचे भूमिपूजन राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुसलदार यांच्या हस्ते करण्यात आले. मुसलदार म्हणाले, समाजासाठी काम करण्याची इच्छाशक्ती ठेवा व आपल्या मुलांना शिक्षित करा. फक्त महिलांसाठी हॉस्पिटल सुरू करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यासाठी सर्वांनी मदत करून या चांगल्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
या वेळी गुजरात महिला आघाडीच्या अध्यक्षा व गुजरात आम आदमी पार्टीच्या सेक्रेटरी अॅड. शाहिना मलेक, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी जमील पठाण, गुजरात जनरल सेक्रेटरी आरिफ समा, सुरत शहर प्रमुख सलिम मुनाफ रांदेरी, सुरत महिला आघाडीच्या हीना मुलतानी, आबीद मन्सुरी शिरपूर, सुफ्फा हायस्कूलचे चेरमन मुन्ना काद्री, डॉ. आरिफ शाह, सुलतान मन्सुरी आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी कारी आकिब रजा यांनी कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात केली. अॅड. शाहिना मलेक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आरिफ शाह यांनी केले. आभार डॉ. सुलतान यांनी मानले. मुस्लिम सेवा संघ जिल्हाध्यक्ष मुजू पहिलवान, डॉ. सुलतान, उपाध्यक्ष मझर तेली, जावेद पठाण, रफिक मुन्शी, जावेद पठाण, माजी नगरसेवक वाजीद मन्सुरी, इम्तियाज सय्यद, हाजी खलील बेलदार, इसरार अली सय्यद, इम्रान पठाण, सल्लू मन्सुरी यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.