आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचा आढावा:बायोमेट्रिक हजेरीतून दुर्गम भागातील दांडी बहाद्दर डॉक्टरांना लावणार चाप; जबाबदाऱ्या पार पाडण्याचा डॉक्टरांना सल्ला

नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात अनेक डॉक्टर उपस्थित रहात नसल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे बायोमेट्रिक मशीन बसवून हजेरी घेतली जाणार आहे. तर हे बायोमेट्रिक बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचा पगारच काढला जाणार नाही. विशेष म्हणजे दुर्गम भागातील डॉक्टरांना त्यांची जबाबदारीच माहिती नसल्याची बाब समोर आली असून अनेक गावात तर प्रसूती घरीच झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

यावर वैद्यकीय अधिकारी निरुत्तर राहिले. परिचारिकांकडून आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्या, असा सल्लाही जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला.

भगवान बिरसामुंडा सभागृहात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महिला, बालके यांच्या आजारासह सिकलसेल, अनेमिया, कुपोषण, गरोदर महिला, पोषण आहार यावर चर्चा झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारूदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, महिला व बाल कल्याण अधिकारी राठोड व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...