आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आम आदमी पार्टी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी बिपीन पाटील नियुक्त

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे नुकतीच आम आदमी पार्टी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. आम आदमी पार्टी महाराष्ट्र संघटन मंत्री व समन्वयक विजय कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राज्यातील सर्व शेतकरी प्रतिनिधीच्या वतीने बिपीन पाटील यांची आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

बिपीन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक उपोषण व आंदोलन केले. या कार्याची दखल घेत यांच्यावर आम आदमी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, आम आदमी पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी व विश्वास बिपीन पाटील यांच्यावर टाकला आहे. या वेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी बोलताना सांगितले की आम आदमी पक्षाने माझ्याकडे आम आदमी पार्टी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यास मी संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते आजही प्रलंबित आहे. शेतकरी कर्ज कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्नरत राहील, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...