आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बिरसा मुंडा कृषी योजना; मंजुरी आदेशांचे केले वाटप, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीषकुमार नाईक उपस्थित

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत मंजुरी आदेशांचे वाटप येथील पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीषकुमार नाईक, पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी, गटविकास अधिकारी सी.के. माळी उपस्थित होते.

याप्रसंगी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन २०२१-२०२२ अंतर्गत विविध बाबी नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती, पाइप संच, ऑइल इंजीन, इलेक्ट्रिक मोटार या बाबींसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मंजुरी आदेशांचे आमदार नाईक व सभापती कोकणी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी शिरीष कोकणी, विजय मिस्त्री, सरपंच प्रदीप गावित, संगी गावित, जया गावित, मोथुसेल गावित, देवसिंग गावित उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की विहिरीची व विहीर दुरुस्तीचे अनुदान वाढवण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून अनुदान वाढवण्याचा प्रयत्न करेन. नवापूर तालुक्यासाठी असंख्य योजना आणल्या असून, त्यांचा लाभ आदिवासी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन केले. सभापती कोकणी यांनीही मनोगत व्यक्त केले.. प्रास्ताविक कृषि अधिकारी शिरीष कोकणी यांनी केले. प्रधानमंत्री आवाज योजना डेमो हाऊसचे फीत कापून आमदार नाईक यांनी उद्घाटन केले.

विहिरींसाठी पडतो निधी अपुरा : बीडीओ माळी
गटविकास अधिकारी माळी म्हणाले की लाभार्थींना विहिरीचे काम करताना वाढत्या महागाईमुळे अडचणी येत आहे. त्यामुळे निधी अपुरा पडतो. आमदार शिरीषकुमार नाईक यांनी कृषिमंत्र्यांशी चर्चा करून निधी वाढवून मिळावा, अशी विनंती लाभार्थींच्या वतीने केली.

बातम्या आणखी आहेत...