आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बूथ सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात दोनशेपेक्षा जास्त, लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा मिळवेल असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी यांनी व्यक्त केले. भाजपतर्फे बूथ सशक्तीकरण कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपचे तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, तालुका कार्यालय प्रमुख देवेंद्र देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्की चौधरी, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष लोटन पाटील, हिंगोणी ग्रामपंचायतीचे सदस्य मिलिंद पाटील, जगन्नाथ पाटील, अजिंक्य शिरसाठ, अशोक माथणे, रमेश चौधरी, राजूलाल मारवाडी, रवींद्र राजपूत, सुनील माळी, नितीन पाटील आदी उपस्थित होते. बबन चौधरी म्हणाले की, सर्व बूथप्रमुखांनी नमो पे, सरल पे, माय गव्हर्नमेंट पे व वोटर हेल्थ अॅप डाऊनलोड करावे. तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप करून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहाेचवव्यात. मेरा बूथ सबसे मजबूत या उपक्रमातंर्गत मतदारांशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.