आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चाैधरी यांना प्रदेश कार्यकारिणीत महामंत्री पद देण्यात आल्याने त्यांचे जिल्हाध्यक्षपद इतरांकडे जाणार असल्याचे संकेत खुद्द विजय चौधरी यांनीच अनौपचारिक गप्पांमधून दिले. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील चौघे पदाधिकारी इच्छूक असून त्यापैकी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी काेणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना सलग दोन वेळा जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यांच्या २४ तास पक्षासाठी वाहून घेतलेल्या कार्याकडे पाहून त्यांची आता प्रदेश महामंत्रिपदी वर्णी लागली आहे. जळगाव, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांना लवकरच जिल्हाध्यक्ष पद सोडावे लागणार असून जिल्हाध्यक्ष पदासाठी चौघांची नावे चर्चेत आहे.
तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील व सदानंद रघुवंशी या तिघांनी जिल्हाध्यक्ष पदाची मागणी केली असल्याची पक्षात चर्चा आहे. तसेच विक्रांत मोरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे नावही जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. डॉ.शशिकांत वाणी, नागेश पाडवी यांनी या पूर्वीच पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे या चाैघा इच्छुकांमधूनच जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड केली जाणार आहे.
पदाला आले महत्त्व
आता राज्यात तसेच केंद्रातही पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाला माेठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पदासाठी काेणाची निवड हाेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.