आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश महामंत्रिपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार जिल्हा भाजपच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे.या पदासाठी आधी राज्य स्तरावरून प्रदेशाध्यक्षांकडून शिफारस केली जाते. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडून १९ मुद्यांच्या स्तरावर त्या व्यक्तीचे कार्य तपासले जाते. त्यानंतरच योग्यतेनुसार हे सन्मानाचे पद दिले जाते. नंदुरबार जिल्ह्यात विजय चौधरी यांच्या रुपाने प्रथमच असे पद मिळाले आहे. बावनकुळे यांनी चौधरी यांना भाजप प्रदेश कार्यालयात बोलावून या पदाचे नियुक्ती पत्र देत जबाबदारी सोपवली.
यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील संघटन करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर असल्याचा उल्लेख त्यांनी याप्रसंगी केला. या वेळी संघटन मंत्री विक्रांत पाटील, संघटन मंत्री माधवी नाईक, प्रदेश प्रवक्ते किशोर उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चौधरी यांची नियुक्ती झाल्याने माजी आमदार शिरीष चौधरी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे फटाके फोडत व पेढे भरवत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष संजय साठे, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, नगरसेवक चारुदत्त कळवणकर आदी उपस्थित होते. तळोदा येथे शहराध्यक्ष योगेश चौधरी व तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी तसेच नारायण ठाकरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.