आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:भाजप; काँग्रेससह शिंदे सेनेची मुसंडी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबारसह जिल्ह्यातील शहादा, नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील एकूण १२३ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि शिंदेनेने मुसंडी मारली आहे. तर अक्कलकुवा तालुक्यात उद्धवसेनेने सर्वाधिक १० ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. नंदुबार तालुक्यातील १८, नवापूर तालुक्यातील १६, तळोदा तालुक्यातील १ अक्कलकुवा तालुक्यातील ३१, शहादा तालुक्यातील १० आणि धडगाव तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. प्रत्येक ग्रामपंचायतील अत्यंत चुरशीच्या निवडणुका झाल्या.

त्यात नंदुरबार तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कानळदे ही ग्रामपंचायत भाजपाने बिनविरोध खिशात घातली. उर्वरित १७ ग्रामपंचायतीत १० ग्रामपंचायती शिंदे शिवसेनेने पटकावल्या असून उर्वरित ७ जागांवर भाजपने झेंडा फडकवला. १८ पैकी १० जागा चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिंदे गटाने तर ८ जागांवर डॉ. विजयकुमार गावित यांच्या भाजपने पटकावल्या. तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजेला मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी १२.१५ वाजेला सर्व मतमोजणी संपवण्यात आली. तहसिल कार्यालयासमोर प्रचंड गर्दी झाली होती. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ९ टेबलांवर मतमोजणी पार पडली.

नंदुरबार तालुक्यातील सरपंच : खैराळे- उरिदास मनशा गांगूर्डे (७४२), कोठडा- मनिषकुमार सुरेश पाडवी (४६०), धानाेरा - रीना प्रकाश पाडवी (१२१८), ढंढाणे- फूलसिंग हारसिंग ठाकरे (५८१), करणखेडा - जमीला बदया नाईक (५९९), तलवाडे - विद्या दिनेशा पाटील (६९८), घूली - कुसुमबाई बाबूराव ठाकरे (२३९), ओसर्ली- जयश्री अमोलसिंग गिरासे (५७४), तिसी- दिलीप पोपट गिरासे (२३३) राकसवाडे- अविनाश अंबरसिंग भिल, कानळदे - प्रमिलाबाई दशरथ पाटील (बिनविरोध), सातुर्खे- सरपंच वंदनाबाई हिरालाल पाटील (३३८), रनाळे- नलिनी जितेंद्र ओगले (२७७२), चौपाळे- नामदेव फका भिल (११०६), घोटाणे - सचिन धनगर (९२३), रजाळे -राजू देवचंद मराठे (८९४), आसाणे- सीमा शरद पाटील (६४४), अमळथे - रमणबाई गुलाब कोळी (२४०)

विजयी मिरवणुका
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल एकण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोटी गर्दी केली होती. विजयाची घोषणा होताच गावातून विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. या ेवळी गुलालाची मोठ्या प्रमाणावर उधळन करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी करडी नजर ठेवली होती.

इश्वरचिठ्ठीने विजय : घूली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणूकीत वार्ड क्रमांक तीनमध्ये भीमा आनंदा ठाकरे व नवनाथ रमेश भ्ील या दोघांनाही सारखी मते पडली. इश्वर चिठ्ी काढून नवनाथ रमेश भील यांना विजयी घोषीत करण्यात आले. निकाल लागल्यानंतर सरंपच पदाच्या उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आल्या.

विजयाचा जल्लोष : शिंदे गटाच्या उमेदवारांनी गुलालांची उधळण करीत माजी आमदार तथा शिंदे शिवसेना गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेत विजय उत्सव साजरा केला. तर भाजपाच्या उमेदवारांनी विरल विहारमध्ये पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या बंगल्यासमोर जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...