आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्फूर्त हजेरी:अंध कलाकारांनी ऑर्केस्ट्राच्या‎ माध्यमातून केले मंत्रमुग्ध‎

शहादा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भक्ती संगीतापासून तर देशभक्तीपर गीते, त्याचबरोबर‎ विविध फिल्मी गीतांचे गायन करत अंध कलाकारांनी‎ आपल्या सुरेल व गोड आवाजाने शहादेकरांना मंत्रमुग्ध‎ केले. निमित्त होते मेलडी आॅर्केस्ट्राच्या माध्यमातून‎ सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांच्या मदतीसाठी‎ निधी गोळा करण्याचे.‎ शहादा शहरवासीयांच्या व परिसरातील शैक्षणिक,‎ वैद्यकीय, व्यापारी, वकील संघाच्या सहकार्याने ४‎ फेब्रुवारी रोजी रात्री शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील‎ अन्नपूर्णा लॉन्स येथे चेतना मेलडी आॅर्केस्ट्राचे आयोजन‎ करण्यात आले होते.

चेतना मेलडी आर्केस्ट्राच्या‎ माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत निधी गोळा‎ करून दिव्यांगांना आर्थिक सहकार्य व्हावे, त्याचबरोबर‎ दिव्यांग बांधवांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुण,‎ कौशल्य समाजा पावेतो पोहोचवावे, हा मूळ उद्देश होता.‎ साधारणतः १५ ते २० वर्षांपासून हा ऑर्केस्ट्राच्या‎ कार्यक्रम होत असून, समाजात इतर डोळस‎ व्यक्तींप्रमाणेच आम्हीही काही कमी नाही हे यातून‎ कलाकारांनी दाखवून दिले.

अंधत्व हे परमेश्वराकडून‎ मिळालेले वरदान आहे. अंध असूनही माणूस जगू‎ शकतो व कार्यक्रम घेऊ शकतो, हे या कार्यक्रमातून‎ समाजाला कलाकारांनी दाखवून दिले. अंध व्यक्तींबद्दल‎ समाजाचा दृष्टिकोन बदलावा हेही यातून कलाकारांनी‎ दाखवून दिले. या वेळी या गीत गायन मैफलीत‎ शहरवासी यांनी उस्फूर्त हजेरी लावत कलाकारांना‎ चांगलीच दाद दिली.‎

बातम्या आणखी आहेत...