आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा तालुक्यातील बोरद विविध कार्यकारी सोसायटीची संचालक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध करण्यात आली होती. तद्नंतर चेअरमन पदा बाबत काल रात्री उशिरापर्यंत सहमती झाली नव्हती. या बाबत आज पुन्हा बैठक घेण्यात आली व सर्व संचालक मंडळाच्या सहमतिमे प्रथमच अनेक वर्षांची परंपरा मोडत चेअरमनपदी सरोजबाई चुनीलाल पाटील या महिला प्रतिनिधीची निवड करण्यात आली. तर व्हा. चेअरमनपदी गणेश सोमनाथ चौधरी यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
सन १९५९ झाली बोरद विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ह्या सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यंदाही निवडणूक बिनविरोधसाठी माजी चेअरमन कृष्णदास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दत्तात्रय पाटील, प.स.सदस्य विजय राणा, मंगेश पाटील, सोमनाथ सुपडू पाटील, सोमनाथ पुना पाटील, इप्तीहार तेली, भीमसिंग राजपूत,रतिलाल पाटील, किशोरसिंग राजपूत,पुंडलिक पाटील, चुनीलाल पाटील यांनी परिश्रम घेतले.
संचालक मंडळात गणेश सोमनाथ चौधरी, जितेंद्र रघुनाथ पाटील, अनिल प्रेमसिंग राजपूत, भीमसेन गोरखसिंग राजपूत, सुनील मथुर पाटील, प्रल्हाद चिमण पाटील, इप्तीहार तेली, जगदीश विश्वनाथ चौधरी, योगेश मधुकर पाटील, अनुसूचित जाती जमाती एस.टी., देविदास बुधा ठाकरे, महिला प्रतिनिधी सुभद्रा गोविंद पाटील, सरोजबाई चुनीलाल पाटील, मनीलाल दुल्लभ ढोडरे.आदी संचालकांची बिनविरोध निवड झाली. सचिव जयपालसिंह राजपूत व लिपिक गोविंद पाटील उपस्थित होते. दरम्यान, चेअरमनपदी निवडीचे आश्वासन दिले होते. परंतु एकमत न झाल्याने संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.