आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय साहित्य वाटप:बोरदला ढोल-ताशांचा गजर; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे केले वाटप

बोरद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ढोलताशांच्या गजरात पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पुन्हा काेराेना रुग्ण वाढू लागल्याने शासनाने खबरदारी म्हणून मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच वर्गखोल्या व इतर साहित्य निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. बुधवारी सुंदर रांगोळीही काढण्यात आली.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच औक्षणही करण्यात आले. त्यानंतर त्यांना ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या प्रांगणात आणण्यात आले. तेथे सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर पर्यवेक्षक भटू पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळेत नियमित येण्याची सूचना केली. ग्रंथपाल दीपक गोसावी यांनी इयत्ता ५ वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. यावेळी शिक्षक अरुण कोळी, जयपाल गिरासे यांनी स्वखर्चाने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्यांचे वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...