आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायपीट:सीमावर्ती मतदार महाराष्ट्रातून गुजरात मतदान केंद्रावर गेले

नीलेश पाटील | नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. झिकझ्याक पद्धतीने महाराष्ट्र आणि गुजरातची हद्द येते. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील दक्षिण गुजरातच्या निवडणूका १ डिसेंबर रोजी झाल्या. सिमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील उच्छल तालुक्यातील हनुमानफळ्या आणि नवाफड्या भागातील तब्बल ६००-७०० नागरिकांना मतदान करण्यासाठी लांब पल्ल्याची पायपीट करावी लागत आहे.

गुजरात राज्यातील मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी महाराष्ट्रातून गुजरातला जावे लागते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग ओलांडून जावे लागते. सर्वच नागरिक रिक्षा, कार किंवा मोटरसायकलने जाऊ शकत नाही. सामान्य कुटुंबातील नागरिक मतदान केंद्रावर पायपीट करत जातात त्यांना या समस्या भेडसावत आहे. गेल्या अनेक वर्षापासून लांब मतदानासाठी जावं लागत असल्याने यांनी त्यांचा भागातच मतदान केंद्र स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...