आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना त्रास:ब्राह्मणपुरी बँक शाखेची इंटरनेट सेवा विस्कळीत ; लाभार्थी दिवस भर ताटकळतात

खेडदिगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या ब्राह्मणपुरी शाखेची इंटरनेट सेवा सतत विस्कळीत राहत असल्याने खेडेगावातून आलेले लाभार्थी हे हैराण होत असल्याचे चित्र आहे. अधिक वृत्त असे की शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे हि शाखा परिसरातील तीस ते चाळीस गावातील संपर्क व खाते असलेली राष्ट्रीयीकृत बँकेची एक मेव शाखा आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचे या ठिकानी नेहमी संपर्क येतो शेतीविषयी,घरकुल,संजय गांधी निराधार,गरोदर माता,शाळकरी मुले,नोकरदार वर्ग,सामान्य खाती आदी सर्व व्यवहार या ठिकाणाहून चालतात त्यात ही सदर बँकेची इंटरनेट सेवा सतत विस्कळीत होत असल्याने लाभार्थी दिवस भर ताटकळत बसून राहतात सदर बँक शाखेला बि.एस.ऐन.एल ही इंटरनेट सेवा पुरवत असून त्यांच्या कडून समाधान कारक सेवा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही तास नाही तर एक एक आठवडा इंटरनेट सेवा बंद असल्याचे अनुभव येथील लाभार्थींनी घेतले आहे. या प्रकारे ३ ऑगस्ट रोजी सकाळपासून इंटरनेट सेवा बंद झाल्याने साधारण १५ ते २० किमी अंतरावरून या ठिकाणी वयोवृद्ध लाभार्थी व कामाचा वेळ सोडून आलेले नागरिक दिवसभर ताटकळत बसले होते.

बीएसएनएल कंपनीची सेवा होते खंडित
बीएसएनएल कंपनीची नेट सुविधा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो. याबाबत संबंधित कंपनीने लक्ष द्यावे.
पार्थ कुकाडीया, सहाय्यक प्रबंधक, सीबीआय शाखा ब्राम्हणपुरी.

बातम्या आणखी आहेत...