आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरची घटना:जमावबंदीचे उल्लंघन; 82 जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील नवापूर शहरात १३ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर प्रसारित पोस्टच्या निषेधार्थ नवापूर पोलिस ठाण्याच्या बाहेर ६० जणांनी अचानकपणे बेकायदेशीर जमाव जमवला. या जमावाने पोलिस ठाण्याच्या समोर जोरजोरात घोषणाबाजी, नारे देवून आरडा ओरड केली. तसेच त्या जमावाने सार्वजनिक शांततेचा भंग करुन जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. तसेच ही बाब शांतता व सुव्यवस्थेस बाधक असल्याचे आढळून आले.या प्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व नवापूरचे पोलिस निरीक्षक भापकर यांना संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी हिरे व पोलिस निरीक्षक भापकर यांनी जमावाला नियंत्रित केले. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे जमावातील २२ ज्ञात व ६० अज्ञात इसमांविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवला. त्यानंतर १९ आरोपींना पाेलिसांनी अटक केली. उर्वरीत आराेपींचाही पाेलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...