आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा ठोठावली:लाचखोर अधीक्षकास एक वर्षाची शिक्षा

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार कार्यमुक्त झाल्याच्या आदेशाची प्रत देण्याकरिता तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे वर्ग तीनचे कार्यालयीन अधीक्षक रमेश रेशमा पाडवी यांनी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने शहाद्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी साक्षी व पुराव्याच्या आधारे एक वर्षाची कैदेची शिक्षा व पाच हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

१२ सप्टेंबर २०१४ या वर्षी ही तळोदा येथे लाच मागण्याची घटना घडली होती. तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे वर्ग तीनचे कार्यालयीन अधीक्षक रमेश रेशमा पाडवी यांनी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्या आला होता. या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंग गिरासे यांनी सरकारतर्फे कामकाज चालवले. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी केला होता. पैरवी अधिकारी म्हणून पोना अमोल मराठे यांनी कामकाज पाहिले. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास अॅन्टीकरप्शन नंदुरबारचे पोलिस अधीक्षक राकेश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...