आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांची मागणी:करार नूतनीकरणास लाच; जि.प. कर्मचाऱ्यावर गुन्हा

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत २०१९ पासून राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान येथे समन्वयक म्हणून ११ महिन्यांच्या करारावर कार्यरत महिलेकडून नूतनीकरणासाठी १० हजारांची लाच व्हॉट‌्सअॅप ग्रुपवर मेसेज टाकून मागितल्याची बाब समोर आल्याने चिंचपाडा, करंजी खुर्द (ता.नवापूर) येथील जि.प. अंतर्गत राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाचे कर्मचारी दिनेश दिलीप भामरे याच्या विरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला.४ ऑगस्ट रोजी दिनेश भामरे यांनी तक्रारदाराकडे कराराचे नूतीनकरण व बदली सोयीच्या ठिकाणी करून देण्यासाठी पैशांची मागणी केली.

११ ऑगस्ट रोजी आपले मानधन झाले आहे, कृपया १० हजार प्रत्येकाने ट्रॉन्स्फर करावे. मला उद्या जिल्हा कक्षाला द्यावे लागतील. असा मेसेज समन्वयासाठी बनवलेल्या व्हाॅट‌्सअॅप ग्रुपला टाकला. त्यानंतर तक्रारदार महिलेने १२ आॅगस्ट रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाच मागिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी वाघ, समाधान वाघ, पोहवा पाटील, ठाकरे, पो.ना. मनोज अहिरे, पोना गावित, मपोना ज्योती पाटील,पाेना मराठे आदींनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...