आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तळोद्यात शिक्षकाच्या घरात चोरी; 52  हजार रुपयांचा ऐवज लांबवला

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भरवस्तीत असलेल्या खान्देशी गल्लीत चोरट्यांनी शिक्षकाचे बंद घराच्या कडीकोंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५२ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.तळोदा शहरातील खान्देशी गल्लीत राहणारे नेमसुशील माध्यमिक विद्या मंदिराचे शिक्षक सचिनकुमार पंचभाई हे भाड्याच्या घरात राहतात. ३० नोव्हेंबर रोजी घरातील सर्व सदस्यांसह ते नाशिक येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते.

दि. ३ रोजी त्यांना घर मालकाने त्यांचा घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी उघडून चोरीचा प्रयत्न केल्याचे त्यांना सांगितले. घरी आल्यावर चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अज्ञात चोरट्यांचा विरोधात सचिन पंचभाई यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तात्काळ पोलीस विभागाच्या वतीने ठसे तज्ञ व व श्वान पथकास प्राचारण करण्यात आले, डॉग स्कोड पथकात पो.हवालदार दिलीप गावित व पो.ना. गोकुळ गावित, फॉरेन्सिक लॅबचे ठसे तज्ज्ञ वानखेडे यांनी काम पाहिले. तपास काँ. सुधीर गायकवाड करीत आहेत.

चोरट्यांनी असा चोरून नेला घरातील दागिन्यांचा ऐवज
चोरट्यांनी लोखंडी कपाटातील २ हजार रूपये रोख, दीड तोळे वजनाची सोन्याची ३० हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चैन, १३ हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या, ३ हजार रुपये चे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण ४८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...