आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:घरफोडीप्रकरणाची 4 महिन्यांत सुनावणी पूर्ण; आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावास

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सहा महिन्यांपूर्वी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास व दहा हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कैदेचे शिक्षा नंदुरबार न्यायालयाने सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवून अवघ्या ४ महिन्यातच खटल्याची सुनावणी पूर्ण करुन निकाल जाहीर केला आहे.

१० नोव्हेंबर २०२१ रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा १० ते १.३० वाजेदरम्यान दरम्यान किशोर माणिक रौंदळ यांच्या घराचे कुलूप तोडून २ लाख ३० हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंदनगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांचेदेखील घराचे कुलूप तोडून ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमंतीचे सोने चांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख घरफोडी झाली.

पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षककळमकर यांच्याकडे सोपवला. पथकाने शैलू ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा (वय-४० रा.सिहोर मध्यप्रदेश), संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी, वय-४० रा. पिपलाणी,मध्य प्रदेश) यांना पुणे येथून अटक केली होती. गुन्ह्याचे दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.विनोद चव्हाण यांच्या न्यायालयात ५० दिवसातच सादर केले. अवघ्या ४ महिन्यातच खटल्याची सुनावणी पूर्ण करुन दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावली. नंदुरबार जिल्हा निर्मीतीनंतर प्रथमच घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. सहायक सरकारी अभियोक्ता अॅड.सुनील पाडवी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार गणेश धनगर, पोना मनोज साळुंखे, गिरीश पाटील यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...