आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:नूपुर शर्माचा पुतळा दहन; ८ जणांवर गुन्हा

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतानाही शहरातील सुतार मोहल्ला परिसरात काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचा पुतळा दहन करून त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली.

याप्रकरणी रियाज अहमद सैय्यद (रा.चिराग गल्ली, नंदुरबार), सोहेल मिर्झा (रा.खिलाफत चौक, नंदुरबार), शोएब चायना, साजिद, मुजाहिद (तिन्ही रा.गाझीनगर नंदुरबार) व अन्य तीन जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शैलेंद्र माळी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास असई सादिक शेख करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...