आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा:ग्रामीण भागात आजपासून शाळांसाठी बसेस धावणार; विद्यार्थ्यांची होणार सोय

नंदुरबार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा १५ जूनपासून सुरू झाल्यानंतर आता बसस्थानकावर विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे. शनिमांडळसह अनेक गावांना अजूनही बस सेवा सुरू न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. ज्या गावांना एकही गाडी जात नाही व विद्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी अडचणीचे ठरत आहे, अशा गाडया मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी तात्काळ पास काढून घ्याव्यात, असे आगार व्यवस्थापक मनोज पवार यांनी सांगितले.

नंदुरबार तालुक्यातील ४ हजार विद्यार्थी हे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येत असतात. अशातच शाळा सुरू होऊन पाच दिवस झाले मात्र पुरेशी बस सेवा नसल्याने मुलांचे हाल होत आहेत. वाहक, चालकांनीही बसेस वाढविण्याची मागणी केली आहे. शनिमांडळ, आसाणे, धानोरा या मार्गावर बसेस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. बस आगारात केवळ ५० जणांनीच पासेस काढल्या आहेत. तर उर्वरित विद्यार्थी रोज भाडे खर्च करून शाळेत जात आहेत. उद्या उर्वरित बसेस सुरू करण्यात येणार आहेत. ज्या गावांना एकही गाडी जात नाही व विद्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी अडचणीचे ठरत आहे, अशा गाडया उद्यापासून सुरू करू. विद्यार्थ्यांनी तात्काळ पास काढून घ्याव्यात, असेही आागार व्यवस्थापक मनोज पवार यांनी सांगितले.

२१ बसेस सुरू होण्याची प्रतीक्षा
सध्या ८५ बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही २१ बसेस सुरू करण्याच्या बाकी आहेत. त्या बसेस सुरू झाल्याशिवाय विद्यार्थी व अन्य प्र्रवासी यांना बस सेवा सोयीची ठरणार नाही. मानव विकासच्या बसेस देखील सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. बलवंड, बलदाणे, खोलघर, वसलाई, खापर मुक्काम, पिंपळनेर, अलिया वाडा आदी गाडयांची सेवा उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या बस सेवेने प्रवास करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...