आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केक:तलवारीने कापला केक; तरुणाला घेतले ताब्यात ; यशोदीप ओगले यांच्या पथकाने ही कारवाई केली

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तरुणाने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करून फोटो समाज माध्यमांतून व्हायरल केल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेत या तरुणास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली आहे. प्रकाशा येथील अजय विजय गावित (वय २४, रा. मुंजळा हट्टी, प्रकाशा) याने ५ जून रोजी गावातील गौरव हॉटेल जवळ धारदार तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. तसेच हे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले. त्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अजय गावित यास ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे कबूल केले. तसेच ज्या तलवारीने केक कापला होता. ती तलवार अजय गावित याने काढून दिल्याने त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, जितेंद्र अहिरराव, कॉन्स्टेबल किरण मोरे, यशोदीप ओगले यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, वाढदिवस साजरा करणे हा गुन्हा नाही; परंतु तलवार किंवा धारदार शस्त्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तलवार, धारदार शस्त्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करताना आढळून आल्यास किंवा दहशत पसरवताना मिळून आल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...