आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:धांद्रेतील रेशन दुकानाचा परवाना‎ रद्द करा; ग्रामसभेने केला ठराव‎

शहादा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धांद्रे बुद्रूक येथील‎ स्वस्त धान्य दुकान नेहमी बंद‎ असते. लाभार्थ्यांना नियमित धान्य ‎मिळत नाही. वारंवार सूचना‎ देऊनही दुकानदाराच्या‎ कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने ‎ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभेत ठराव ‎करुन संबंधित स्वस्त धान्य‎ दुकानाचा परवाना रद्द करून‎ कारभाराची चौकशी करावी, अशी‎ मागणी तहसीलदार डॉ.मिलिंद‎ कुलकर्णी यांच्याकडे तक्रार‎ अर्जाद्वारे केली आहे.‎

धांद्रे गावातील स्वस्त धान्य‎ दुकान नेहमी बंद असते.‎ लाभार्थ्यांना नियमाने रेशन मिळत‎ नाही. लोकांना रेशन दुकानदाराची‎ वाट पाहत बसावे लागते. नोव्हेंबर‎ २०२२ पासून दुकान नियमित बंद‎ असते. जो माल वाटप होतो त्याची‎ पावती दिली जात नाही, असाही‎ आरोप तक्रारीत केला आहे.‎ त्यामुळे परवाना रद्द करावा व‎ गावातील बचत गटांना नवीन‎ परवाना मंजूर करावा, असा ठराव‎ ग्रामसभेने सर्वानुमते पारित‎ केल्याचेही दिलेल्या निवेदनात‎ नमूद केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...