आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील खामला येथील एकाच्या घरात १ लाख ५२ हजार १४५ रुपये किमतीचा १४ किलो ४९० ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण यांना पारशा कोंडया पराडके (रा. खामला ता. धडगाव) हा त्याच्या घरात बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परीणाम करणारे गुंगीकारक गांजा हा अंमली पदार्थाची विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक पठाण यांनी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारशा कोंडया पराडके याच्या घरात छापा टाकला.
त्याच्या घरात १ लाख ५२ हजार १४५ रुपये किंमतीचा १४ किलो ४९० ग्रॅम इतका वजनाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा आढळून आला. त्याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक आय. एन. पठाण, उपनिरीक्षक प्रविण महाले, पोहेकॉ राजेंद्र जाधव, जयेश गावितांच्या पथकाने कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.