आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार:डाबची स्ट्रॉबेरी जाणार मध्य प्रदेश, गुजरात राज्यात‎

धडगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील‎ डाब व वालंबा येथील गाव पाड्यांवर‎ कृषी विभागामार्फत स्ट्रॉबेरी‎ लागवडीसाठी विशेष प्रयत्न करून‎ गेल्या वर्षी सात हेक्टर क्षेत्रावरून‎ यावर्षी २० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी‎ लागवड करण्यात यश आले आहे.‎ स्ट्रॉबेरी विक्रीसाठी नाशिकच्या एका‎ कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे‎ शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ‎ हाेऊ शकणार आहे.‎

येथील स्ट्रॉबेरी मध्य प्रदेश‎ राज्यातील इंदूर व गुजरातमधील‎ अहमदाबाद तसेच शेजारील अन्य‎ राज्यांमध्येही या कंपनीच्या माॅलमधून‎ विक्री केली जाणार आहे. स्ट्रॉबेरी‎ उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे पुढे‎ चांगले दिवस येणार असून गावागावात‎ किंवा दारोदारी फिरून स्ट्राॅबेरी विक्री‎ करण्याची गरज पडणार नाही. नंदुरबार‎ जिल्ह्याच्या ठिकाणी सहायक‎ जिल्हाधिकारी पुलकित यांनी‎ नगरपालिकेच्या सहकार्याने चार‎ ठिकाणी स्ट्रॉबेरी विक्रीसाठी स्टाॅल‎ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून‎ दिली आहे. त्यात हाट दरवाजा, अंधारे‎ स्टाॅप, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोरील जागा आहे.‎

बातम्या आणखी आहेत...