आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:काेरोनाच्या ५५ अर्जांवर झाली सुनावणी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मदत : १ हजार ३५६ अर्जांना आहे मंजुरी, ७५ जणांना बोलावले होते सुनावणीला

कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मिळणारी ५० हजाराच्या रकमेसाठी २ हजार ५८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १ हजार ३५६ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी पुन्हा प्रलंबित तसेच नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर सुनावणी झाली. या वेळी ५५ जण उपस्थित होते. कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या वारसदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोना काळात अनेकांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांची कुटुंबावर मोठे संकट आले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात साधारण १ हजाराच्या आसपास कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा शासनाने जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष ही आकडेवारी दुप्पट आहे. अर्थात २ हजार ५८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील पात्र अर्ज एक हजार ३५६ अर्जांना मान्यता देण्यात आली. तसेच १ हजार ३३३ जणांचे पन्नास हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ४२७ अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यात ७५ नागरिकांना शुक्रवारी सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यापैकी ५५ जणांचे नातेवाईक व वारसदार सुनावणीसाठी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनिषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. व्ही. बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन थोरात यांच्या समितीने सुनावणी घेतली.

बातम्या आणखी आहेत...