आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आवाहन

नंदुरबार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेले व व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यात आलेले विद्यार्थ्यांनी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे आपल्या महाविद्यालयातून ऑनलाइन फॉर्म भरून नोडल अधिकाऱ्यामार्फत २९ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव प्राची वाजे यांनी केले आहे. जात पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरताना अर्जामध्ये स्वत:चा किंवा पालकांचा ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक नमूद करावा, ऑनलाइन फॉर्म भरताना मूळ कागदपत्रे अपलोड करावी.

हार्ड कॉपी सादर करावी
प्रकरण ऑनलाइन सादर झाल्यानंतर हार्ड कॉफी व कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सहीने साक्षांकित करून ३० दिवसांच्या आत जात पडताळणी समिती कार्यालयास सादर करावी. विद्यार्थ्यांची जात पडताळणीचे ऑनलाइन अर्ज प्रकरणे विहीत वेळेत न भरल्यास महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येईल, असे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...