आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार नंदुरबार शहरातील जातिवाचक गल्ली, वस्त्या व मोहल्ल्यांची नावे हटवून समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संत, महात्मे व थोर पुरुषांची नावे त्यांना देण्यात येतील, असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी येथे केले.
नंदुरबार नगर परिषदेच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष स्व.वासुदेव महादेव बेहेरे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घराजवळील चौकाचे स्व.वासुदेव महादेव बेहेरे नामकरण करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व माजी आमदार रघुवंशी यांनी माजी प्रथम नगराध्यक्ष स्व.वासुदेव बेहेरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरिता बापट यांनी केले.१० वर्षांपूर्वी पालिकेने माजी नगराध्यक्षांची नावे शहरातील रस्त्यांना देण्याच्या निर्णय घेतला होता. रामचंद्र माहेश्वरी, वेडू गोविंदा राजपूत यांची नावे रस्त्यांना दिली.
परंतु या प्रक्रियेत खंड पडला. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक परवेज खान, विरोधी पक्षनेते चारूदत्त कळवणकर, नगरसेवक जगन्नाथ माळी, प्रेम सोनार, संचेती पाटणकर, धनंजय पाटणकर, सरिता बापट, धनंजय बापट, स्मिता गोगटे, दत्ता गोगटे, प्रज्ञाली दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.