आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:समता पर्वानिमित्त जातवैधता प्रमाणपत्रांचे झाले वितरण; समान संधी केंद्राचा उपक्रम

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील डी.आर.कनिष्‍ठ महाविद्यालयात समता पर्व निमित्त महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जातवैधता प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रकल्प सहायक सुमित सोनार, पोलिस काॅन्स्टेबल मयुर गढरी, प्राचार्य एन.के. भदाणे, उपमुख्याध्यापक एस.व्ही. चौधरी, उपप्राचार्य एम.एल. अहिरराव, पर्यवेक्षक पंकज पाठक या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयातील जात पडताळणीकरिता समान संधी केंद्राने हा कार्यक्रम घेतला.

बातम्या आणखी आहेत...