आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुका:शहादा येथे पोलिस गाड्यांना लावले सीसीटीव्ही ; पोलिस दलाचा पहिला नावीन्यपूर्ण प्रयोग

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत यांनी चक्क दोन पोलिस गाड्यांना तीन-तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. जिल्ह्यात हा पहिला प्रयोग आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासह हा चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्ह्यात शहादा येथेच चार टप्प्यात विसर्जन मिरवणुका निघत असतात. शिवाय विसर्जनाच्या मार्गदेखील मुख्य रस्त्याने जात असल्याने दरवर्षी पोलिसांची मोठी दमछाक होते. जिल्ह्यातून सर्वात जास्त पोलिस बंदोबस्त शहाद्यात लावावा लागतो हा सारा प्रकार बघता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवाय गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस गाड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवा व्यतिरिक्त या दोन्ही पोलिस गाड्या शहरात गस्त करतील, त्यावेळी सीसीटीव्ही फायदेशीर ठरणार आहेत. गणेश उत्सवात विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मिरवणुकांसह इतर हालचालींवर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून निरीक्षण केले जाणार आहे. विनाकारण गर्दीतून वाद निर्माण करणाऱ्यावर चांगलाच वचक बसणार आहे. अकरा दिवस प्रत्येक मंडळाचे चित्रीकरण होण्यास मदत राहील. एकंदरीत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हा चांगला प्रयोग असून या सीसीटीव्ही माध्यमातून जिल्हा पोलिस अधीक्षक शहादा येथील पोलिस बंदोबस्त बघू शकतील. उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलिस स्टेशनला देखील तंत्रज्ञानाचा वापर करून संपर्क जोडण्यात आलेला आहे, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...