आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ:बारामतीला होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी शहाद्याच्या खेळाडूंची वर्णी

शहादा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बेसबॉल खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

महाविद्यालयातील सचिन भागवत गाडीलोहर, रितिक गोपाल मोरे, मंगेश तुकाराम वाडिले, आशिष दिलीप सोनवणे, लोकेश गोविंद चौधरी, रोहित रत्नाकर वसावे, विजय कैलास भुजबळ या खेळाडूंची बारामती येथे १४ ते १८ मार्च दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. अरविंद कांबळे, संस्थेचे अध्यक्ष दीपक

पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर, क्रीडा मंडळाचे संयोजक डॉ. आय. जे. पाटील, डॉ. ए. एच. जोबनपुत्रा, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. जी. एस. गवई, प्रा.महेश जगताप, प्रा. खुमानसिंग वळवी, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. अरविंद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...