आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:चावरा च्या खेळाडूंची विभागावर निवड

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय लेदर बॉल, टेनिस क्रिकेट व माेंटेक्स बॉल स्पर्धेत घवघवीत यश मिळवले. १४ वर्षाआतील खेळाडूंनी लेदर बॉल क्रिकेट प्रकारात तर १४ वर्ष व १७ वर्षे आतील मुलांच्या दोन्ही संघांनी टेनिस क्रिकेट प्रकारात आणि १९ वर्षा आतील मुला-मुलींच्या संघाने मोंटेक्स बॉल प्रकारात विजय मिळवला आहे. या विजयी संघातील यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विविध खेळांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. लेदर बॉल क्रिकेट प्रकारात चावरा हायस्कूलच्या १४ वर्षा आतील खेळाडूंचा संघ विजयी ठरला. टेनिस क्रिकेट प्रकारात १४ वर्षा आतील व १७ वर्षा आतील असे दोन्ही खेळाडूंचे संघ विजयी झाले. मोंटेक्स बॉल क्रिकेट प्रकारात १९ वर्षा आतील मुले व मुलींचा संघ विजयी ठरले.

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक हर्षबोध बैसाणे, दिनेश व संदीप यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक फादर टेनि फरक्का, उपमुख्याध्यापक फादर सीजीन, पर्यवेक्षिका सिस्टर अन्नू, सिस्टर मरिया, सिस्टर नॅन्सी यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदींनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...