आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्व स्पर्धा:आजपासून रंगणार चेतक एक्वाईन प्रीमियर लीग

सारंगखेडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतक फेस्टिव्हल सारंगखेडा येथे १४ तारखेपासून घोड्यांच्या थरार स्पर्धा पाहावयास मिळणार आहेत. नागरिकांना व अश्व शौकिनांना पहिल्यांदा दिवस रात्र चालणाऱ्या घोड्यांच्या स्पर्धा पाहावयास मिळणार आहे. यावर्षी चेतक एक्वाईन प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये घोड्यांच्या संबंधित असलेल्या अश्व स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

या स्पर्धेत प्रामुख्याने १४ डिसेंबरपासून ते १७ डिसेंबर दरम्यान पोल बेंडिंग, ऑब्स्टॅकल कोर्स, बॅरल रेसिंग, टेंट पेगिंग, बॉल अँड बकेट, हॉर्स जम्पिंग शो हॅक्स गेम असणार आहेत. तसेच १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान अश्व नृत्य स्पर्धा, काठियावाडी अश्व सौंदर्य स्पर्धा, नुकरा अश्व सौंदर्य स्पर्धा, रेवाल अश्व शर्यत स्पर्धा, मारवाडी अश्व सौंदर्य स्पर्धा तसेच सारंगखेडा नच के दिखादे नृत्य स्पर्धा, मिस अँड मिसेस तनिष्का, राष्ट्रीय चित्र शिल्प स्पर्धा व प्रदर्शन सारख्या कौशल्यपूर्ण मजेदार स्पर्धांचे आयोजन चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून केले आहे. यासाठी ६० बाय ७० चे स्टेज बनवले आहे. यात वेगवेगळ्या प्रजातींच्या अश्वांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...