आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविज्ञान परिषद:जलप्रदूषण, आरोग्यासह जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बालसंशोधकांचे उपाय

नंदुरबार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरानजीक वाहणारी पाताळगंगा नदी ठिकठिकाणी प्रदूषित झाली आहे. तसेच वेफर्स, कुरकुरे खाण्यामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. यावर पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असा निष्कर्ष काढून त्यावर उपाय सूचवून बालसंशोधकांनी आपला प्रकल्प बालविज्ञान परिषदेत सादर केला आहे.

येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार व वात्सल्य सेवासमितीतर्फे आयोजित बालविज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष नरेंद्र सराफ यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याध्यापक नारायण भदाणे, जिल्हा शैक्षणिक समन्वयक पंकज पाठक, जिल्हा समन्वयक आशिष वाणी उपस्थित होते. बाल संशोधकांनी वेगवेगळे संशोधन करून ते सादर करण्यात आले. सकाळी ११.३० वाजेला बालकांनी मायक्रो प्रोजेक्ट सादर करण्यास सुरुवात केली. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी संशोधन केल्याचे परीक्षकांच्या निदर्शनास आले. परिसरामध्ये विविध घटकांचा परिणाम मानव जातीवर होत असून या समस्येतून काय केले पाहिजे, यावर बालवैज्ञानिक वैज्ञानिकांनी वीर उपाय सुचवले. भविष्यात संशोधक होण्यासाठी बालविज्ञान परिषद महत्त्वाची ठरणार आहे.

२६८ प्रकल्पांचे सादरीकरण
यात शनिवारी ८ ते १२ यो गटातील १२५ विद्यार्थी सहभागी झाले असून, रविवारी २० रोजी ५ ते ७ गटातील विद्यार्थी प्रकल्प सादर करणार आहेत. जिल्ह्यातून एकूण २६८ प्रकल्प सादर होणार आहेत. यातील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत सोळा प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल.

आरोग्य विषयावर अधिक भर
यंदाच्या वर्षी मुख्य विषय आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे असा असून ५ उपविषयात तुमची परिसंस्था जाणून घ्या, आरोग्य पोषण आणि कल्याण वाढवणे, परिसंस्था आणि आरोग्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धती, आत्मनिर्भरतेेसाठी परिसंस्थेवर आधारित दृष्टिकोन व परिसंस्था व आरोग्यासाठी तांत्रिक नवकल्पना हे विषय आहेत. यावर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले.

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळाला वाव
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान या विषयात गोडी निर्माण व्हावी व त्यांच्या स्वैर कल्पनांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी भारत सरकारकडून या विज्ञान परिषदेचे आयोजन होत असते. यंदाचे हे ३० वे वर्षे असून या उपक्रमाची जिल्हा समन्वयक संस्था ही वात्सल्य सेवा समिती आहे.-आशिष वाणी, जिल्हा समन्वयक, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...