आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:मिरचीला गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिळताेय दुपटीपेक्षा अधिक दर; गुजरातमधूनही आवक

नंदुरबार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २५ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली असून लगतच असलेल्या गुजरात राज्यातील ग्रामीण भागातूनही वाहनांद्वारे मिरची विक्रीसाठी आणली होती. ओल्या मिरचीला यंदा गत वर्षाच्या तुलनेत जवळपास दुपटीपेक्षा अधिक दर मिळत आहे. एक महिना हंगाम सुरू होऊन झाला असून ओल्या मिरचीला पाच हजारांपासून साडेनऊ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. गत वर्षी अडीच हजार ते सहा हजार रूपये प्रती क्विंटल भाव होता.

यंदा आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत मिरचीचे उत्पादन घटल्याने यंदा मिरचीला चांगला दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी व बुधवारी बाजार समितीचे आवार मिरची आणलेल्या वाहनांनी भरून गेले हाेते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर म्हणाले की, मंगळवारी अडीच हजार क्विंटल मिरचीची आवक झाली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. दरांत ५०० रूपये घट किंवा वाढ होत असते. गौरीला साडेचार ते पाच हजार रुपये प्रती क्विंटल, २८७ एनआरला ६ हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रूमकी तलाव या गुजरातमधील गावातूनही मिरची विक्रीसाठी आली होती.

५५३१ या वाणाच्या मिरचीला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.मंगळवार, बुधवारी तर बाजार समितीचे आवार मिरचीच्या गाड्यांनी भरले होते. सकाळपासूनच मिरचीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नंदुरबारमध्ये लिलाव होताच मिरचीचे रोख रक्कम शेतक-यांना मिळत असल्याने या बाजार पेठेची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळे मिरचीसह अन्य कडधान्य शेतकरी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणतात.

मिरची हंगामास प्रारंभ, यंदा प्रचंड आवक, पथाऱ्याही दुप्पट
नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा मिरचीची प्रचंड आवक वाढली आहे. नुकताच मिरचीच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. जरीला, व्हीएनआर, लाली व तेजा या प्रकारच्या मिरचीला बाजारपेठेत मागणी आहे. तेजा व जरीला ही खाण्यास तिखट तर व्हीएनआर व लाली मध्यम तिखट आहे. मिरचीच्या आवक बरोबरच मिरची व्यापाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पूर्वी १५ पथाऱ्या असायच्या. यंदा दरासाेबत मिरचीच्या पथाऱ्यांची संख्याही वाढली असून ३० पथाऱ्या आहेत. ज्वारी व मक्याचे उत्पादन घटून मिरचीचे वाढले.

बातम्या आणखी आहेत...