आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:चौपाळे गावातून अल्पवयीन मुलीस पळवले; गुन्हा दाखल

नंदुरबार19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चौपाळे येथे अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून १३ वर्षांची मुलगी पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा कुटुंबीयांनी गावात आणि नातेवाइकांकडे तपास केला; परंतु ती मिळून आली. अखेर याप्रकरणी रमेश ठाणसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस हवालदार नरेश गुरव यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. तिला आमिष देऊन प‌ळवल्याचा संशय व्यक्त केलाय.

बातम्या आणखी आहेत...