आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगा नियंत्रण प्रात्यक्षिके:शहादा येथील नागरिकांनी अनुभवले पोलिसांचे दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

शहादा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक १७ जून रोजी सायंकाळी सहा वाजता शहादा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दंगा नियंत्रण प्रात्यक्षिके करण्यात आली.

सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती बघता तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. कोणत्याही प्रकारे जातीयवाद होणार नाही. नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रात्यक्षिक बघण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा रस्त्यावर गर्दी केली होती. शहादा शहरासह म्हसावद, धडगाव, सारंगखेडा येथील पोलिस कर्मचारी तसेच नंदुरबार येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी सहभाग घेतला होता. यात ढाली, बंदुकी, स्ट्रेचरसह इतर साहित्य आणले होते. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी फायरिंग, अश्रुधूर सोडणे व जमावाला पांगवण्यासाठी, प्रात्यक्षिक दाखवले. या प्रात्यक्षिकात पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे, नंदुरबार येथील पोलिस निरीक्षक राजेंद्र भावसार, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत हे पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...