आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:प्रकाशात तापी नदीची स्वच्छता, वृक्षारोपण अन् मानसन्मान सोहळा; 2 हजार सेवेकरी उपस्थित

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक केंद्रातर्फे प्रकाशा येथील प्रति काशी तीर्थ क्षेत्रातील सूर्य कन्या तापी माता नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता करुन स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच जमा झालेल्या कचऱ्यातून कंपोस्ट खताचे नियोजन करण्यात आले. नदी काठावर पाणी शुद्ध करणाऱ्या व प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पतींची लागवड, वृक्षारोपण करुन पर्यावरण स्वच्छता व प्रदूषणमुक्त परिसर करण्याची सेवा करण्यात आली. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचा पाया उभारणी करणारे सद्गुरू प.पू.मोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक सेवा उपक्रम राबवण्यात आले. त्यात गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाने पर्यावरण प्रकृती विभाग व श्री गंगादशहरा उत्सव पंचसूत्री अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या संपुर्ण कृती युक्त सेवेनंतर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जीवन देवरे यांनी नदीपात्र स्वच्छता व प्रतिज्ञा,जमा होणार्या कचऱ्यातून कंपोस्ट खत कसे करावे, नदी काठावर पाणी शुद्ध व प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पतींची माहिती व लागवड या विषयावर प्रबोधन व मार्गदर्शन केले. या समाजोपयोगी सेवेसाठी जिल्ह्यातून जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त संख्येने सेवेकरी उपस्थित होते. हा समाजाभिमुख कार्यक्रम यशस्वितेसाठी युवा संस्कार विभागातील व इतर सर्व सेवेकरी यांनी मोलाची सेवा व सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...