आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पाताळगंगा नदीवरील कठडे गायब

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पाताळगंगा नदीच्या पुलावरून कठडे गायब झाल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून तत्काळ कठडे बसवण्यात यावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.शहरात पाताळ गंगा नदी असून या नदीवर पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र पुलावरील कठडे गायब झाल्याने या भागात केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे पुलावर तत्काळ कठडे बसवण्यात यावेत, अशी परिसरातून मागणी होत आहे.

पाताळ गंगा नदीच्या पुलावर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येते. पोलिसांना पाहून अनेक जण वेगात गाडी चालवतात. तसेच याच पुलावरून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाकडे वाहनांची ये-जा सुरू असते. तरी कठडे बसवण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...