आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषि विज्ञान केंद्र:शेतकरी उत्पादक प्रकल्पांना भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामसमुहातील वडसत्रा, सागाळी, भादवड येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या सहयोगाने सुरू असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली.यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार मंदार कुलकर्णी, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारीखत्री यांनी जागतिक बँक अर्थसहाय्यीत याहा आदिवासी नवापूर फार्मस प्रोड्युसर कंपनी, वडसत्रा, नेसू परिसर शेतकरी उत्पादक कंपनी लि., सागाळी, शिवम डेअरी फॉर्म, भादवड पशुखाद्य निर्मिती उद्योग,भात गिरणी, तेलघाणा प्रकल्प अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट देवून प्रकल्प चालविताना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कंपनीचे संचालक सत्यानंद गावित, गुलाबसिंग वसावे, कृष्णा गावित, देवीदास पाडवी, ईश्वर गावित, विष्णू वसावे, दिलीप कोकणी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...