आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:नवापूरला प्रभाग क्रमांक दोनमध्ये कामांचा शुभारंभ

नवापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्र २ मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान आदिवासी उपाययोजना अंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील जनता पार्क प्रभाग क्र २ मध्ये मंगलदास पार्कमधील अजय गावित यांच्या घरापासून ते प्रा. ए.बी. पाटील, हेमंत पाडवी यांच्या तसेच राहुल साळुंके यांच्या घराजवळील रस्ता डांबरीकरण तसेच जनता पार्क मार्ग क्र.१ मधील नारायण मराठे यांच्या घरापासून ते मार्ग क्र. ३ मधील विजय शर्मा यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण तसेच जितेंद्र गिरासे यांच्या घरापासून ते प्रा.दीपक जयस्वाल यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे या सर्व विकास कामांचा शुभारंभ आमदार नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष अयुब बलेसरिया, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक आरिफ बलेसरिया, प्रभाग क्र. २ चे नगरसेवक विशाल सांगळे, नगरसेविका बबिता वसावे, माजी नगरसेवक अजय पाटील, सुभाष कुंभार, विजय सैन, नारायण सुथार, निकितेश मराठे, राजेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही...यावेळी आमदार नाईक म्हणाले की, मी दिलेले आश्वासन पूर्ण केले. शहराचा विकास हे माझे स्वप्न आहे. रस्ते, पथदिवे यासोबत विकास कामे मंजूर करून ती सुरू झाली आहेत. लोकांच्या मागणीप्रमाणे कामे करत आलो. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. येत्या काळात विकास कामांमुळे शहराचा कायापालट होईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...