आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालिकेच्या नव्या इमारतीमधील माणिकराव गावित सभागृहात पहिलीच तर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या कारकीर्दीतील शेवटची सभा मंगळवारी पार पडली. आमची शहराशी बांधीलकी आहे. ती पुढेही कायम राहील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी सर्व नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला.उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होते. पाच वर्षांमध्ये सर्वांगिण विकासात पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. कोरोनाच्या भीषण संकटात सेवा सुविधा नागरीकांना उपलब्ध करून दिल्या.
विरोधी पक्षाचे चारूदत्त कळवणकर म्हणाले, लवकरच प्रशासक बसेल. अशा वेळेस जनतेची कामे प्रशासन करेल याची शाश्वती नाही. लोकांची कामे झटपट हाेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी,अशी विनंती आहे. भाजपचे गौरव चौधरी म्हणाले, अनुकंपावर लोक भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे फार नुकसान झाले आहे.
राज्यात केवळ नंदुरबार पालिकाच अशा पध्दतीने कायद्याचे नियम पाळते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी बागुल म्हणाले, राज्यात सर्वत्र एकच कायदा आहे. रिक्त जागांमध्ये २० टक्के जागा भरता येतात. मात्र भरतीला परवानगी नसल्याने जागा भरण्यात आलेल्या नाहीत. प्रशांत चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेत बारा विषयांना मंजुरी देण्यात आली. कार्यालयीन अधिकारी संजय माळी यांनी प्रास्ताविक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.