आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश‎:घरकुलांची कामे पूर्ण करा; स्थायीच्या सभेत निर्देश‎

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १ लाख १४ हजार‎ घरकुलांना मंजुरी मिळाली असून‎ त्यापैकी ८६ हजार घरकुले पूर्ण‎ झाली आहेत. ३२ हजार घरांची‎ कामे अपूर्ण आहेत. ३१ मार्चपर्यंत‎ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे‎ तसेच जो भूमीहीन आहे, असे‎ कुटुंब घरे बांधणार कुठे? असा‎ प्रश्न जिल्हा परिषदेच्या बुधवारी‎ झालेल्या स्थायी समितीच्या सभेत‎ उपस्थित करण्यात आला.‎

जि.प. अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी ‎उपाध्यक्ष सुहास नाईक, समाज ‎कल्याण समिती सभापती शंकर ‎ पाडवी, सभापती गणेश पराडके, ‎सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल ‎करनवाल, अतिरिक्त मुख्य‎ कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार‎ पवार, उपमुख्य कार्यकारी‎ अधिकारी राजेंद्र पाटील आदी‎ उपस्थित होते. घरकुल मंजुरीसाठी‎ आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप‎ ‎सदस्य विजय पराडके यांनी केला.‎ विविध विषयांवर चर्चा झाली.‎

बातम्या आणखी आहेत...