आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाेषणाचा इशारा‎:बिलगाव-सावऱ्या दिगर गावांदरम्यान 10 ‎ वर्षांपासून अर्धवट पुलाचे बांधकाम पूर्ण करा‎

धडगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदय नदीवरील बिलगाव ते सावऱ्या दिगर‎ या गावांना जोडणाऱ्या व मंजूर असलेल्या ‎महत्त्वाकांक्षी पुलाचे अर्धवट काम सुरू‎ करून पूर्ण न करावे, अशी मागणी‎ आदिवासी टायगर सेनेतर्फे तहसीलदारांकडे ‎निवेदनाद्वारे करण्यात आली. काम सुरू न ‎झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा‎ दिला. या मागणीसाठी निदर्शनेही करण्यात‎ आली.‎

बिलगाव ते सावऱ्या दिगर या दरम्यान‎ उदय नदीवर मंजूर असलेला पूल गेली १०‎ वर्षे अर्धवट स्थितीत तसाच आहे. संघटना‎ व सावऱ्या दिगर गावकऱ्यांमार्फत या बाबत‎ १० फेब्रुवारी २०२२ रोजी तहसील‎ कार्यालयात निवेदन देऊनही काम सुरू‎ झाले नाही. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी २१‎ रोजी तहसील कार्यालयास घेराव घातला‎ हाेता.

त्यानंतर प्रशासनाने कंत्राटदार व‎ सार्वजनिक बांधकाम विभाग यांची पुलाच्या‎ अर्धवट कामाच्या ठिकाणी २ मार्चला बैठक‎ घेतली हाेती. त्यात संबंधितांनी काम पूर्ण‎ करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र‎ त्यांनी ते पाळलेले नाही. दरम्यान नर्मदा‎ प्राधिकरण व भिंगारे समिती यांच्या‎ अहवालानुसार या पुलाची निर्मिती सुरू‎ झाली.

पण पुलाचे काम अर्धवट स्थितीत‎ आहे. या परिसरात राहणाऱ्या तब्बल १२‎‎ हजार आदिवासी नागरिकांना शिक्षण,‎ आरोग्य आदी समस्या भेडसावत आहे. त्या‎ साेडवण्यासाठी या पुलामुळे मदत होणार‎ आहे. वर्षभरापासून संघटना वारंवार‎ पत्रव्यवहार करत आहे. मात्र सार्वजनिक‎ बांधकाम विभागामार्फत काम सुरू‎ करण्याबाबत हालचाल केली जात नाही.‎ त्यामुळे २० दिवसांची मुदत देत असून त्यात‎ पुलाचे काम सुरू न झाल्यास संघटना‎ पदाधिकारी, ग्रामस्थ उपोषणास बसतील.‎

बातम्या आणखी आहेत...